अमरावती, महाराष्ट्र येथे पंधरा वर्षापासून स्वतःचे हॉस्पिटल असून बालरोग तज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसाय करतो. मी ‘लर्न गीता’ कार्यक्रम जानेवारी 2024 ला जॉईन केला. याची लिंक मला माझी आई सौ. सुनंदा नागलकर यांनी दिली होती. मला बारावा, पंधरावा अध्याय शिकल्यानंतर श्रीमद् भगवद्गीतेची आवड निर्माण झाली व मी श्लोक पाठांतर सुद्धा करू लागलो . परंतु खूप जास्त लक्ष मी या कार्यक्रमात घातले नव्हते. लेव्हल दोन मध्ये मुख्य प्रशिक्षिका सौ मनीषाताई अर्ते यांनी चार अध्याय शिकवले .
यादरम्यान सौ मनिषा ताई यांचे स्पष्ट व शुद्ध उच्चार, शिकवण्याची तळमळ व पद्धत मला खूप आवडली व मी ठरवले की आपण सुद्धा सौ मनिषा ताई यांच्यासारखे प्रशिक्षक व्हावे. व मनापासून श्लोक पाठांतर करायला सुरुवात केली,गीता जिज्ञासू व गीता पाठक परीक्षा उत्तीर्ण झालो, ताईंच्या मार्गदर्शनामुळे पुढे पुढे अभ्यास, प्रयत्न करत गेलो . मला जून महिन्यामध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून लेवल एक ला श्री भगवंताच्या कृपेने संधी मिळाली सोबतच मी जानेवारीपासूनच टेक्निकल असिस्टंट व ग्रुप कोऑर्डिनेटर या सेवा पण द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे मला बॅच कोऑर्डिनेटर म्हणून लेवल एक व दोन ला पण सेवा देण्याची संधी मिळाली, श्रीमद्भगवद्गीतेचा हा प्रवास अत्यंत आनंददायक व मनःशांती देणारा ठरलेला आहे. माझा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून मी हे करू शकत आहे, ही श्री भगवंताची कृपा आहे असंच मी आता श्रीकृष्णाचे बोट धरलेलं, कधीच सोडणार नाही आहे .
आपण सुद्धा लर्न गीता कार्यक्रमाद्वारे फक्त ४० मिनिटे, ऑनलाइन झूम मीटिंग अटेंड करून चारही लेव्हल पूर्ण करावे व गीताव्रती व्हावे हीच मनापासून शुभेच्छा!!